Blog
चिखलीतील मुस्लीम आणि बौद्ध समाजाच्या स्मशानभूमींना मूलभूत सुविधा मिळाव्यात; भाजप अल्पसंख्याक शहराध्यक्ष नईम सौदागर.
भाजपा अल्पसंख्यांक मा. जिल्हा अध्यक्ष शेख अनिस शेख बुढन निवेदन देतांना यांची सुध्दा उपस्थिती होती.

क़ासीद / चिखली (प्रतिनिधी): चिखली शहरातील गौरक्षणवाडी येथील मुस्लीम कब्रस्तानात रात्रीच्या वेळी प्रकाशव्यवस्थेचा अभाव असल्याने दफनविधीमध्ये अडथळे येत असल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित करत, भाजप अल्पसंख्याक शहराध्यक्ष मो. नईम मो. सब्बीर सौदागर यांनी नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांकडे ट्युबलर पोल आणि हायमस्ट पोल उभारण्याची मागणी केली आहे. तसेच, सिद्धार्थ नगर येथील बौद्ध स्मशानभूमीमध्ये शवदाहणी (लोखंडी कडघर) नसल्यामुळे प्रेतदाहणीत अडचणी येत असल्याचे नमूद करत, त्यासाठीसुध्दा तात्काळ व्यवस्था करण्याची विनंती केली आहे. या मागण्यांसाठी सौदागर यांनी मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर केले असून, शहरवासीयांच्या धार्मिक भावनांचा आदर राखण्यासाठी नगरपरिषदने तातडीने कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. या वेळी भाजपाचे जेष्ठ नेते शेख अनिस शेख बुढन यांची उपस्थिती लक्षवेधुन घणारी होती.
चिखली शहरातील गौरक्षणवाडी परिसरात असलेल्या मुस्लीम समाजाचे कब्रस्ताना बाबत लागणाऱ्या मूलभूत सुविधांबाबत सौदागर यांनी निवेदनात सविस्तर माहिती दिली आहे. या कब्रस्तानापासून मुख्य रस्ता तसेच जाफ्राबाद रोडपर्यंत आणि आतल्या भागात रात्रीच्या वेळी कोणत्याही प्रकारची प्रकाशव्यवस्था नसल्यामुळे दफनविधी करताना मोठ्या प्रमाणात अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले. “एखादी मयत व्यक्तीचे दफनविधी पार पाडण्यासाठी पुरेशी प्रकाशझोत उपलब्ध नसल्याने कुटुंबीयांना आणि स्थानिकांना फार मोठा त्रास होतो. मुख्य रस्त्यापासून आतल्या स्मशानभूमीपर्यंत २५ ते ३० ट्युबलर पोल आणि ४ हायमस्ट पोल उभारण्याची अत्यंत आवश्यकता आहे. ही सुविधा उपलब्ध झाल्यास रात्री बे रात्रीही सुरक्षितपणे दफन विधी पार पाडता येतील,” असे निवेदनात नमूद केले आहे.
तर सिद्धार्थ नगर येथील बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीमध्ये शवदाहणीची व्यवस्था नसल्यामुळे प्रेतदाहणीतही गंभीर समस्या निर्माण होत असल्याचे नईम सौदागर यांनी अधोरेखित केले. सद्यस्थितीत मयताचे सरण लाकडी पद्धतीने उभारले जाते, ज्यामुळे प्रेत पूर्णपणे जळण्यास फार वेळ लागतो. “लोखंडी कडघर (शवदानी) बसविल्यास प्रेतदाहण प्रक्रिया जलद आणि सुरक्षित होईल. ही सुविधा नसल्यामुळे बौद्ध समाजाच्या कुटुंबीयांना अतिरिक्त खर्च आणि त्रास सहन करावा लागतो,” असे निवेदनात म्हटले आहे. सौदागर यांनी या दोन्ही स्मशानभूमींसाठी तात्काळ निधी उपलब्ध आणि कार्यान्वयन करण्याची मागणी केली असून, मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले आहे. शहराच्या सर्व घटकांना न्याय देण्यासाठी नगरपरिषदने हे पाऊल उचलावे,” अशी विनंती निवेदन देते वेळी केली आहे.
चिखली शहरातील मुस्लीम आणि बौद्ध समाजाच्या प्रतिनिधींनी या मागणीचे स्वागत केले आहे. कब्रस्तानातील प्रकाशव्यवस्थेच्या अभावामुळे अनेकदा दफन विधीमध्ये विलंब होतो. ही मागणी योग्य आहे आणि ती तात्काळ मान्य होईल, अशी शहरवचासीयांची अपेक्षा आहे. तर लाकडी सरणमुळे प्रदूषण वाढते आणि प्रक्रिया किचकट होते. लोखंडी कडघर हे दीर्घकालीन उपाय आहे, ज्यामुळे बौद्ध मोठा दिलासा मिळेल.
या मागणीमुळे चिखलीतील सामाजिक समरसतेचा एक चांगला उदाहरण समोर आले असून, भाजप अल्पसंख्याक शाखेच्या या पुढाकाराचे शहरवासीय सराहणीत आहेत. सौदागर यांच्या या प्रयत्नामुळे इतरही धार्मिक स्थळांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. या वेळी भाजपा अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष शेख अनिस शेख बुढन, आज़म ठेकेदार, शायर आकीब मोहम्मद यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते



