Blog

चिखली नगरपरिषद निवडणूक २०२५: मतदार यादीसाठी हरकती दाखल करण्याची मुदत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढली

क़ासीद / सय्य्द साहील (दि. १३ ऑक्टोबर २०२५) : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, चिखली नगरपरिषदेच्या सन २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार याद्यांचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यानुसार, प्रारूप मतदार यादीनुसार हरकती आणि सूचना दाखल करण्याची मुदत वाढवण्यात आली असून, मतदारांनी तात्काळ नोंद घ्यावी, असे आवाहन नगरपरिषदेने केले आहे.
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ च्या आदेशानुसार, चिखली नगरपरिषद (जि. बुलढाणा) सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठीचा सुधारित कार्यक्रम प्रारूप मतदार यादीनुसार हरकती व सूचना दाखल करण्याचा सुधारित कालावधी: मूळ अंतिम मुदत १३ ऑक्टोबर २०२५ होती, जी आता शुक्रवार, दि. १७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. मतदारांनी या कालावधीत आपल्या हरकती किंवा सूचना नोंदवाव्यात. अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करणे (सुधारित)  शुक्रवार, दि. ३१ ऑक्टोबर २०२५. व मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध करणे आणि मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करणे: शुक्रवार, दि. ७ नोव्हेंबर २०२५ असा झाला आहे.
या सुधारित कार्यक्रमामुळे मतदारांना अधिक वेळ मिळेल आणि निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल, असे प्रशांत बिडगर मुख्याधिकारी, चिखली नगरपरिषद यांनी सांगितले. मतदारांनी आपल्या नावांची पडताळणी करून आवश्यक कागदपत्रांसह हरकती दाखल कराव्यात. यासाठी नगरपरिषद कार्यालयात संपर्क साधावा असेही आवाहन या वेळी मुख्याधिकारी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *