
क़ासीद / रमीज़ राजा (चिखली) : चिखली तालुक्यातील गोद्री गावात शेतात सोयाबीन कापणीच्या कामासाठी गेलेल्या ५० वर्षीय कांताबाई गुलाबराव कुटे या महिलेचा मळणी यंत्रात अडकून जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे शेतकरी कुटुंबीयांवर शोककळा कोसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मृत झालेल्या महिलेचे नाव कांताबाई गुलाबराव कुटे असे असून, त्या चिखली तालुक्यातील गोद्री येथील रहिवासी होत्या. आज दिनांक 20 ऑक्टोंबर 2025 रोजी दुपारी सुमारे ५ वाजेच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. शेतकरी कुटुंब असल्याने त्या नेहमीप्रमाणे शेतीकामात सहभागी झाल्या होत्या. मळणी यंत्रावर काम करत असतांना अचानक त्यांचे केस मळणीयंत्राात अडकल्यामुळे त्यांचे पुर्ण शरीर आत ओढल्या गेले. मळणी यंत्रात अडकल्या नंतर त्यांचे केस डोक्यापासुन वेगळे झाले होते या घटनेमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
कांताबाई यांचे शरीर पोस्टमॉर्टेमसाठी उप जिल्हा उपरुग्णालय, चिखली येथे दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा तपशीलवार तपास चिखली पोलीस ठाण्यातील पोलिस कर्मचारी करीत आहेत.



