Farhan Computer
Blog

आई-वडिलांची क्रूर हत्या करून मुलाने संपवलं जीवन

आई-वडिलांची क्रूर हत्या करून मुलाने संपवलं जीवन
कासिद / चिखली, ६ नोव्हेंबर २०२५ : चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे गावात मंगळवार रात्री (५ नोव्हेंबर) घडलेल्या एका भयानक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. स्वतःच्या आई-वडिलांची कुराडीने हत्या करून ४२ वर्षीय मुलाने आत्महत्या करुन स्वत:चे जिवन संपविले आहे. या घटनेमुळे स्थानिक लोकांमध्ये भीती आणि शोकाची लाट उसळली असून, कौटुंबिक वाद किंवा मानसिक तणाव यासारख्या कारणांवरून अशा कृत्याला उधाण आल्याच्या चर्चांना जोर धरला आहे. पोलिसांनी घटनास्थळाची कसून तपास सुरू केला आहे.
मृतांमध्ये ७५ वर्षीय सुभाष दिगंबर डुकरे, त्यांची ६५ वर्षीय पत्नी लता सुभाष डुकरे आणि त्यांचा ४२ वर्षीय मुलगा विशाल सुभाष डुकरे यांचा समावेश आहे. हे तिघेही सावरगाव डुकरे गावातील एकाच घरी राहत होते. प्राथमिक माहितीनुसार, विशालने प्रथम आई-वडिलांवर वार केले आणि नंतर स्वतःला संपवले.
घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील आणि इतर वरिष्ठ अधिकारी यांनी घटनेची पाहणी केली. घराला पूर्णपणे सील करण्यात आले असून, पंचनामा आणि फॉरेन्सिक तपास सुरू आहे. घटनास्थळावरून सापडलेली कुऱ्हाड तर रक्ताचे डाग, बोटांचे ठसे आणि इतर पुरावे गोळा करण्यात आले आहेत. तिन्ही मृतदेहांना उपजिल्हा रुग्णालय चिखली येथे पोस्टमार्टमसाठी हलवण्यात आले असुन पुढील तपास सुरु आहे.