क्राइम

मुलाने खाटेच्या पायाने केली वृद्ध आई-वडिलांची निर्घृण हत्या.

मुलाने खाटेच्या पायाने केली वृद्ध आई-वडिलांची निर्घृण हत्या.

क़ासिद / रमिज राजा (चिखली) : चिखली तालुक्यातील अमडापूर पोलिस ठाणे अंतर्गत येणाऱ्या ग्राम किन्ही सवडद येथे आज संध्याकाळच्या सुमारास गणेश महादेव चोपडे (वय अंदाजे ४५) याने स्वतःच्या वृद्ध आई-वडिलांची खाटेच्या लाकडी पायाने आज दि. २७ सप्टेंबर २०२५ रोजी निर्घृणपणे हत्या केली. घटना घडल्यानंतर गावात शोककळा पसरली असून, अमडापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले आहे.

या बाबत सविस्तर असे की गणेश महादेव चोपडे (वय अंदाजे ४५ वर्ष) राहणार किन्ही सवडद तालुका चिखली जिल्हा बुलढाणा याने स्वतःची वृद्ध आई कलावती बाई महादेव चोपडे (वय ७०) व वडील महादेव त्र्यंबक चोपडे (वय ७५) यांची हत्या केली. संध्याकाळच्या वेळी घरात आई वडील एकटे असताना आरोपी गणेशने प्रथम आपल्या वडिलांवर हल्ला केला. खाटेच्या मजबूत लाकडी पायाचा वापर करून त्याने वडिलांच्या डोक्यावर आणि छातीवर अनेकदा वार केले व नंतर आईला सुद्धा संपविले.चोपडे कुटुंबात काही घरगुती वाद असल्याचे बोलल्या जात आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अमडापूर पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि आरोपीला अटक केली.

ग्राम किन्ही सवडद हे अमडापूर तालुक्यातील एक शांत गाव आहे, जेथे बहुसंख्य लोक शेती-व्यवसायावर अवलंबून आहेत. चोपडे कुटुंब हे गावातील साधे-भोळे कुटुंब म्हणून ओळखले जाते. प्राथमिक तपासात घरगुती वाद हे खूनाचे कारण असल्याचे पोलिसांना सांगितले जात आहे. सततच्या भांडणांमुळे आरोपीच्या मनात राग साठला होता, असा संशय आहे. “घटना घरगुती वादातून झाली असली तरी मूळ कारण जाणून घेण्यासाठी सखोल चौकशी सुरू आहे. पुढील तपासात मूळ कारण उघड होईलच, पण या घटनेने तालुक्यातील ग्रामीण भागातील सामाजिक समस्यांना नव्याने हात घालण्याची वेळ आली आहे.