Farhan Computer
विशेष

ग्रामीण पत्रकार संघ खामगावतर्फे पत्रकार दिनानिमित्त पत्रकार ॲड. शहजाद उल्ला खान यांचा गौरव

ग्रामीण पत्रकार संघ खामगावतर्फे पत्रकार दिनानिमित्त पत्रकार ॲड. शहजाद उल्ला खान यांचा गौरव

क़ासिद / लाखनवाडा बु | : ६ जानेवारी पत्रकार दिनानिमित्त ग्रामीण पत्रकार संघ, खामगाव तालुक्याच्यावतीने जि.प. हायस्कूल, लाखनवाडा बु येथे आयोजित विशेष सन्मान सोहळ्यात युवा नेतृत्व पत्रकार ॲड. शहजाद उल्ला खान जुबैरउल्ला खान यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमोद बापू देशमुख होते. प्रमुख उपस्थितीत उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी, गटविकास अधिकारी चंदन सिंग राजपूत , नायब तहसीलदार भाजी भाकरे मॅडम, किशोर अप्पा भोसले, संताराम तायडे व संदीप पाल महाराज आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संदीप पाल महाराज यांच्या सामाजिक प्रबोधनपर सप्तखंजेरी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. सुत्रसंचालन श्रीकृष्ण चौधरी यांनी केले.