मलगी येथील गॅस सिलिंडर स्फोट प्रकरणी इंण्डेन गॅसच्या अधिकाऱ्याकडून पाहणी
स्फोटात झालेल्या नुकसानीसाठी तत्काळ मदत करण्याचे आश्वासन.

रमीज राजा /चिखली : तालुक्यातील मलगी येथील श्रीमती शोभाबाई रमेश परिहार यांच्या घरात गॅस सिलेंडरचा स्फोट होवून आई व मुलगा गंभीररित्या जखमी झाल्याची घटना २६ ऑगस्ट रोजी रात्री ८.३० वाजता घडली होती. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ इंण्डेन गॅस कंपनीचे अधिकारी, ‘कर्मचारी मलगी गावात दाखल झाले. आणि पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले.
मलगी येथील रहिवाशी अंगणवाडी मदतनीस श्रीमती शोभाबाई रमेश परिहार वय ४५ वर्ष ह्या २६ ऑगस्ट रोजी ‘सायंकाळी घरात स्वयंपाक करत असतांना अचानक गॅस सिलेंडर चा स्फोट झाला. आणि या गॅस स्फोटामध्ये श्रीमती शोभाबाई रमेश परिहार व मुलगा राजेश रमेश परिहार हे दोघे गंभीररित्या जखमी झाले होते. या दोघा मायलेकांना गावकऱ्यांनी लगेच पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालय संभाजीनगर या ठिकाणी हलवण्यात आले. तसेच आग आटोक्यात आणण्यासाठी नगरपरिषद चिखली येथील अग्निशमनदलाची गाडी व चिखली पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी बोलावन घेतले, अशी माहिती तंटामुक्ती अध्यक्ष श्रीकांत राऊत. सरपंच विनायक सिताराम साप्ते, दिलीप शंकर शितोळे यांनी अशी माहिती दिली.
जळगाव येथील इंण्डेन गॅस कंपनीचे फील्ड ऑफिसर कुलदीपसिंग, चिखली येथील इंण्डेन गॅस एजन्सीचे मालाक शैलेश बाहेती, श्रीकृष्ण साळोख कर्मचारी संदीप भाले, केशव महाले, रमीज राजा, शिवाजी जाधव यांनी मलगी येथे घटनास्थळी जावून घटनेचा पंचासमक्ष पंचनामा केला, आणि घडलेला प्रकार पाहून सदर जखमी कुदुंबाला कंपनीच्या माध्यमातून मदत आणि घरातील जळालेले घरगुती भांडे, साहित्य देण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी गावातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



