Blog
पत्रकार कैलास इंगळे यांना राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार…
संजीवनी बहुउद्देशीय संस्थेच्या 18 व्या वर्धापन दिनानिमित्त गौरव सोहळा संपन्न.

बुलडाणा (शेख मुख्तार) : केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभाग पुरस्कार प्राप्त संजीवनी बहुउद्देशीय संस्था, केवळद यांच्या वतीने संस्थेच्या 18 व्या वर्धापन दिनानिमित्त दि. 05 ऑक्टोबर 2025 रोजी सामाजिक न्याय भवन, बुलडाणा येथे आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात पत्रकार कैलास ओंकार इंगळे (रा. बोरगांव वसु, ता. चिखली, जि. बुलडाणा) यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आणि सामाजिक भान जपणाऱ्या त्यांच्या योगदानाची दखल घेऊन संजीवनी संस्थेने हा राज्यस्तरीय सन्मान प्रदान केला.
या कार्यक्रमात कार्यक्रमाध्यक्ष आमदार संजयभाऊ गायकवाड, प्रमुख पाहुणे म्हणून आमदार श्वेता महाले यांच्या वडिलांची उपस्थिती, तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. निवृत्तभाऊ जाधव यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमादरम्यान विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. पत्रकार कैलास इंगळे यांच्या सन्मानामुळे चिखली तालुका आणि बुलडाणा जिल्ह्यात अभिमानाची भावना व्यक्त करण्यात येत असून, स्थानिक पत्रकार व समाजसेवकांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.



