क़ासिद / रमीज राजा (चिखली) : शहरातील सहारा पार्क परिसरात राहणाऱ्या शिक्षकाचा मृतदेह घरामागील विहिरीत आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीचे नाव रामदास भास्करराव पडघान असे असून, ते सहारा पार्क येथे वास्तव्यास होते.
मिळालेल्या माहितीनुसार, पडघान सर हे मागील दोन दिवसांपासून बेपत्ता होते. नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोधमोहीम सुरू होती. अखेर आज सकाळी त्यांच्या घरामागील विहिरीत त्यांचा मृतदेह तरंगताना आढळला.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून मृतदेहाचा शवविच्छेदन करण्यात आले.मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.