प्रभाग क्र. १ मध्ये  अॅड. जावेद चौधरी यांची अपक्ष उमेदवारी ऑटोरिक्षा चिन्हाला विशेष पसंती …

चिखली/सत्य कुटे :नगर परिषद निवडणुकीत प्रभाग १ मधून अॅड. जावेद चौधरी हे अपक्ष उमेदवार म्हणून ऑटोरिक्षा या निवडणुक चिन्हावर निवडणुक लढवत आहेत. प्रभागातील त्यांची लोकप्रियता त्यांना विजयासाठी पुरक ठरत आहे.

विधी क्षेत्रात कार्यरत असलेले जावेद चौधरी हे सामाजिक व राजकीय श्रेत्रात सदैव कार्य करीत आहेत. कायदेविषयक जाणीव असलेला उमेदवार म्हणून त्यांना जनमानसात पसंती दर्शवली जात आहे. त्याच्या ऑटोरिक्षा या निशाणी समोरील बटण दाबून त्यांना विजयी करा, असा प्रभागातील प्रचार पाहता त्यांच्या बाजूला जनमत तयार झाले असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
नगर परिषद निवडणुकीत ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित असले तरी त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यांच्या उमेदवारी मुळे प्रभागातील नागरिकांकडून त्यांना विजयी करण्याबाबत च्या चर्चा सुरू झाली आहे.ऐवढे मात्र निश्चित!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *