ध्वज विजयाचा उंच धरा रे उंच धरासक्षम, निष्ठावंत नगराध्यक्ष.. काशीनाथ विश्वंभरआप्पा बोंद्रे !

कासीद/सत्य कुटे .:नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या तुल्यबळ लढतीत राजकीय, सामाजिक श्रेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणारे काशीनाथ विश्वंभरआप्पा बोंद्रे यांच्याविजयाचे संकेत स्पष्ट दिसू लागले आहेत.
महाविकास आघाडीच्या प्रचारातील मुद्दे शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे, जनतेला दिलासा देणारे असून त्यामुळे आपसूकच नगराध्यक्ष पदाचे जनमत काशिनाथ बोंद्रे यांच्या बाजूला विजयाचा कौल देत आहे.कार्यकर्त्यांचा मतदारांमध्ये उत्साह निर्माण करणारा प्रचार हा तितकाच महत्त्वाचा ठरत असू महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काशिनाथ विश्वंभरआप्पा बोंद्रे यांच्या विजयासाठी प्रत्येक प्रभागात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे .
काशिनाथ बोंद्रे यांचे जनमानसातील मिळून मिसळून वावरणे त्याच्या विषयी लोकांमध्ये आपुलकी वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते आहे. जनमानसातील लोकाभिमुख चेहरा म्हणून त्यांना सोशल मीडियावरही सर्वाधिक पसंती दर्शवली जात आहे.
चिखली शहराच्या राजकीय वर्तुळात बोंद्रे परिवारातील अनेक सदस्यांनी नगर परिषद अंतर्गत सुमारे ५३ वर्षे नगराध्यक्ष, नगरसेवक पदाचा कार्यभार सांभाळला आहे. काशीनाथ विश्वंभरआप्पा बोंद्रे यांचा आजपर्यंतचा सामाजिक, राजकीय श्रेत्रातील वावर लक्षणीय राहिला आहे. माजी नगर परिषद उपाध्यक्ष कुणाल बोंद्रे यांच्या सुविद्य पत्नी सौ. प्रियाताई कुणाल बोंद्रे यांच्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात काशीनाथ विश्वंभरआप्पा बोंद्रे यांनी अप्रत्यक्षरीत्या नगर परिषद अंतर्गत कामकाजाचा जवळून अनुभव घेतला आहे.हे विशेष!
नगर परिषद निवडणुकीत प्रभागनिहाय महा विकास आघाडीचे नगर सेवक पदांचे उमेदवार आपपल्या प्रभागात सक्षम उमेदवारी सिद्ध करण्यासाठी ऐकवटले असल्याचे चित्र विजयाचा विश्वास निर्माण करणारे आहे.महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष, नगरसेवक हे सोबत सोबत प्रचार करीत असल्याने मतदार बांधवांना पक्षांतर्गत ऐक्याचा प्रत्यय येत आहे.
काशीनाथ विश्वंभरआप्पा बोंद्रे लढवीत असलेली ही निवडणूक तेवढीच चुरशीची , रंजक ठरणार आहे. प्रतिस्पर्धी तुल्यबळ असताना नेतृत्व सिद्ध करणे यातच खरे कसब असते. या निवडणूकीत काशिनाथ बोंद्रे हे बहुमताने विजयी होऊन नगराध्यक्ष पदी विराजमान होतील हा जनमानसातील निर्णायक आशावाद सार्थ ठरेल, ऐवढे मात्र निश्चित!



