Farhan Computer
अपघात

बोरगाव वसू फाट्यावर बस-टिप्परची भीषण धडक; टिप्पर चालकाचा जागीच मृत्यू

बोरगाव वसू फाट्यावर बस-टिप्परची भीषण धडक; टिप्पर चालकाचा जागीच मृत्यू

क़ासीद / चिखली : चिखली-खामगाव मार्गावर चिखलीपासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरगाव वसू फाट्याजवळ शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास बस आणि टिप्परची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात टिप्पर चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून बसचालकाचे दोन्ही पाय गंभीर जखमी झाल्याने निकामी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर ते अकोला या जाणाऱ्या बसला बोरगाव वसू फाट्याजवळ समोरून येणाऱ्या भरदाव टिप्पर क्रमांक एमएच २८ एबी ८२२८ सोबत जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की टिप्परच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला. टिप्परची केबिन मोठ्या प्रमाणात दबल्याने टिप्परचा चालक सचिन वाघ, राहणार संभाजी नगर चिखली याचा जागीच मृत्यु झाला तर बसचालकही या अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याचे दोन्ही पाय गंभीररीत्या जखमी झाले व इतर प्रवाशांना दुखापत झाली असुन त्याना उपचारासाठी विविध रुग्णालयात भरती करण्यात आले आह. सदर टिप्पर हा बाळू जाधव राहणार हातानी यांच्या मालकीचा असल्याचे समजते.

अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहनांमुळे काही काळ परिसरात गर्दी निर्माण झाली होती. दरम्यान, 'हॅलो बुलढाणा'चे चिखली प्रतिनिधी सैय्यद साहिल यांनी अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत माणुसकीच्या नात्याने मदतकार्य सुरू केले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस तसेच आपत्कालीन यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य करण्यात आले. जखमींना पुढील उपचारासाठी चिखली येथल रुग्णालयात हलविण्यात आले असुन त्याच्यावर उपचार सुरु आहे. पोलीस यंत्रणांकडून अधिकृत माहिती प्राप्त झाल्यानंतर अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल.